लक्ष्मीबाई गणेशकर यांचं निधन
सोलापूर : येथील दमाणी नगर भागातील गडदर्शन सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती लक्ष्मीबाई विष्णू (खलिपा) गणेशकर यांचं रविवारी सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या मृत्यूसमयी ७५ वर्षीय होत्या. त्यांच्या पार्थिवावर कोयनानगर स्मशानभूमीत सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. शिवसेना नेते दत्तात्रय गणेशकर यांच्या त्या मातोश्री होत.