सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने विकसित केलेल्या संकेतस्थळाचे मंगळवारी, २२ ऑक्टोबर रोजी बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांच्या शुभहस्ते रिलॉचिंग करण्यात आले.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सध्या एकूण २०७ शाखा व प्रधान कार्यालयाकडे सी. बी. एस. कार्यप्रणालीनुसार कामकाज सुरु असून १०६ वर्षापासून अविरतपणे बँकिंग सेवा पुरविण्यात येत आहे. सध्याच्या डिजीटल बँकिंग युगामध्ये बँकांनी सर्व दृष्टीने अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा बँकेचे अधिकृत संकेतस्थळ www.solapurdccb.com यामध्ये काळानुरुप अद्यावत बदल करणे जरुरीचे असल्यामुळे बँकेने अलंकर जाधव (सी.ई.ओ., जे.ए. सोल्युशन, सातारा) यांच्या सहकार्याने व प्रधान कार्यालय बँकिंग विभागाकडील आकाश विडकर यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ विकसित केलं आहे.
याप्रसंगी बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी आर.डी.गोटे, सहा.व्यवस्थापक (बैंकिग विभाग) एम.पी.देशपांडे,आय.टी विभाग प्रमुख व्ही. बी. आंधळकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
.... चौकट .....
... एका क्लिकवर मिळेल माहिती
हे संकेतस्थळ विकसित केल्यामुळे जिल्हा बँकेचा इतिहास, विविध योजना, सेवा सुविधा, ठेव व योजना इत्यादीची माहिती खातेदारांना एका क्लिकवर अवगत होणार आहे.