राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; सोलापूर विभागात ९८ लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त

shivrajya patra


सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त सागर धोमकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्याच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव,  यांनी कार्यभार स्विकारल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हा अन्वेषणाच्या मोहिमेच्या अनुषंगाने १९ ऑगस्ट ते ०१ ऑक्टोबर या कालावधीत अवैध मद्य निर्मिती/विक्री/वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागात संयुक्तरित्या विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यात २६९ गुन्हे नोंद करण्यात आले. या मोहिमेत २११ आरोपींवर कारवाई करण्यात आली. २६ वाहनांसह ८०,४३,३३६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावाच्या हद्दीत २० सप्टेंबर २०२४ रोजी केलेल्या कारवाईत ४४२० इतकी लिटर तयार हातभट्टीची दारु व १०,००० इतके लिटर रसायन व हातभट्टी निर्मितीसाठी लागणारे साहित्य असा ८,३५,६०० रुपये किंमतीचा मुद्येमाल नाश करण्यात आलाय. 

मंगळवेढा तालुक्यातील लवंगी ०१ ऑक्टोबर रोजी येथे गोवा बनावटीचे मद्य वाहतुक करीत असताना २ इसमांवर कारवाई करुन त्यांच्या ताब्यातून ३६ ब.लि. गोवा बनावटीचे विदेशी मद्य व एका दुचाकीसह ८३,६३५ रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

महात्मा गांधी सप्ताहात ०२ ते ०३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये  ४३ गुन्हे नोंद करण्यात आले. त्यात ३१ आरोपींवर कारवाई करण्यात आलीय. या कारवाईत १३४० लिटर हातभट्टी दारु, २०,३०० लिटर गुळ मिश्रीत रसायन यासह दुचाकी, तीनचाकी, चारचाकी अशा १० वाहनांसह १८,२८,१९८ रुपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. महात्मा गांधी सप्ताह हा ०८ ऑक्टोबरपर्यंत असून उर्वरित कालावधीतही अशा प्रकारच्या कारवाया विभागामार्फत सुरु राहणार असल्याचं सांगण्यात आलंय.


१९ ऑगस्ट ते ०३ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ३१२ गुन्हे दाखल करण्यात आले. यात २४२ आरोपींवर कारवाई करण्यात आली. त्यात ३६ वाहनांसह ९८,७१,५३४ रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप अधीक्षक एस.आर. पाटील, निरीक्षक जे. एन. पाटील, ओ. व्ही. घाटगे, पंकज कुंभार, एस. जी. भवड, आर. एम. चौरे, बी. एम. बामणे, दुय्यम निरीक्षक श्रीमती अंजली सरवदे, धनाजी पोवार, रमेश कोलते, सुखदेव सिद, समाधान शेळके, दत्तात्रय लाडके, श्रीमती श्रद्धा गडदे, दत्तात्रय पाटील, बापु चव्हाण, बाळु नेवसे, सौरभ भोसले, रविंद्र भुमकर, प्रभाकर कदम, गणेश कुदळे, श्रीमती मृदुला बहुधान्ये, शिवकुमार कांबळे, अमित नांगरे, एम. यु. वाघ, एस. एस. गुठे, लक्ष्मण भागुजी लांघी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक - एस.पी. चव्हाण, एम. बी. जाधव, जी. व्ही. भंडारे, एस. ए. बिराजदार, मुकेश चव्हाण, व्ही. एस. पवार, व सर्व जवान संवर्गातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापुर यांनी अवैध मद्य विक्री/वाहतूक विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारण्यात येणार असून अवैध मद्य विक्री/वाहतूक विरोधात विविध पथके नियुक्त केले आहेत, ही पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत.

नागरिकांना आवाहन 

अवैध मद्यविक्री, अवैध धंदे व वाहतुकीविरोधात कारवाई यापुढेही चालू राहणार असून, अवैध मद्याबाबत माहिती असल्यास टोल फ्री १८००२३३९९९९ क्रमांक अथवा व्हॉटस अॅप क्रमांक ८४२२००११३३ या कार्यालयास माहिती दिल्यास माहिती देणा-याचे नांव गुप्त ठेवले जाईल, असे अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव यांनी सांगून अवैध मद्याबाबतची माहिती कळविण्याचे आवाहन केलं आहे.


To Top