सोलापूर : महात्मा गांधी जयंती दिनानिमित्त सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल सोलापूर जिल्ह्यातून समाजसेवक सादिक नदाफ व महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राचार्य डॉ. एस. के. गायकवाड यांना गोवा राज्याची राजधानी पणजी येथे राज्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास विधानपरिषद अध्यक्ष रमेश तळेकर, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांची मुलगी ममता व मुलगा आणि अभिनेत्री यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय शिखर सोशल वर्कर अवार्ड 2024 चा भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये गौरव सन्मान करण्यात आला.
यावेळी राज्यातील वेगवेगळ्या प्रकारचे अवार्ड घेणारे सन्मानित पुरस्कारप्राप्त व ज्ञानरचना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण साळवे उपस्थित होते.