सोलापूर : पैसे देण्या-घेण्याच्या व्यवहारावरुन १९ तरुणाची हत्या झालीय. ही खळबळजनक घटना येथील इंडियन मॉडेल इंटरनॅशनल शाळेच्या पाठीमागे, रेणुका नगर येथील मोकळ्या मैदानात व तेथेच असणाऱ्या एका पत्र्याचे शेडमध्ये शुक्रवारी रात्री घडलीय. अथर्व दिनेश जाधव असं मृताचं नांव आहे. याप्रकरणी प्रसाद लोंढे, बाळु काळेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विजापूर रस्त्यावरील अमृत नगरातील रहिवासी दिनेश जाधव यांचा मुलगा अथर्व यास ०३ वेगवेगळ्या चार चाकी गाड्यामधून आलेल्या टोळीने त्यांच्यासोबत आणलेल्या लाकडी काठ्या, लोखंडी रॉड व कोयत्याने मारुन गंभीर जखमी करुन त्याचा खून केला. त्याच्यासोबत असलेल्या प्रदिप मंगळवेढेकर, शिवकुमार तंबाखे, राहुल साठे, समर्थ माटे यांनाही जबर मारहाण केली.
याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार प्रसाद लोंढे, बाळु काळे, सागर कदम, केदार गुमटे, मनोज सुर्यराज ऊर्फ भाईजी, अजिंक्य शाबादे, प्रकाश शिंदे ऊर्फ बुध्दा, जॉकी थोरात, विनायक जाधव आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरूध्द भा. न्या. संहिता क १०३(१), १८९ (२), १८९ (४), १९१(१), १९१ (२),१९१ (३),१९०, ३२४(३),३५२,३५१(२) (३), आर्म अॅक्ट ४/२५, मपोकाक १३५ प्रमाणे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.