सोलापूर : गुन्ह्यात अटक केलेल्या मुलास गुन्ह्याच्या तपासात मदत करुन गुन्ह्यातून लवकरात लवकर जामीन करण्यासाठी तसेच गुन्ह्याच्या पुढील तपासात आणखी आरोपीच्या संख्यामध्ये वाढ न करण्यासाठी पोलीस हवालदार सचिन जाधवर यांनी स्वतःसाठी व वरिष्ठांना देण्यासाठी म्हणून पुन्हा तक्रारदार यांचेकडे ५ लाख रुपयांची मागणी करुन तडजोडीअंती २,००,००० रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयार दर्शविल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाल्याने, पोलीस हवालदार सचिन जाधवर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.
कामती पोलीस ठाण्यास नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सचिन जाधवर यांच्याकडे तपासाधीन गुन्ह्यात अटकेत असलेल्या तक्रारदार याच्या मुलास गुन्ह्यात जामीन मिळावा तसेच त्या गुन्ह्यात आरोपीची संख्या न वाढविण्यासाठी तक्रारदाराकडे ५,००,००० रुपयांच्या लाचेची मागणी करुन तडाजोडीअंती २,००,००० रुपये मागणी करुन ती स्विकारण्यास संमती दिल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने पोलीस हवालदार यांच्याविरुद्ध कामती पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७, ७ अ प्रमाणे सचिन जाधवर, पोलीस हवालदार (वर्ग-३) यांच्याविरूध्द अयोग्यरित्या बेकायदेशीर परितोषण स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्याविरुध्द कामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये सांगितलंय.
मार्गदर्शन अधिकारी शिरीष सरदेशपांडे (पोलीस अधीक्षक ला.प्र.वि., पुणे), डॉ. शीतल जानवे/खराडे (अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे) होते तर सापळा पथकातील पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोह सलीम मुल्ला, पोशि राजु पवार, चापोशि शाम सुरवसे (सर्व नेमणुक अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.