कासेगांव/संजय पवार : दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षी हिप्परगा येथील नियोजित शिवसंकल्प सोसायटीच्या वतीने आयोजित 4 थ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार व डिव्हिडंट वाटप करण्यात आले.
यावेळी कासेगाव तंटामुक्तीचे नूतन अध्यक्ष शिवश्री संजय पवार आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठांमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अध्यासन केंद्राचे नूतन सदस्य प्रा. परमेश्वर हटकर सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सोसायटी चेअरमनपदी रामभाऊ जाधव आणि व्हाईस चेअरमनपदी सुजित फडतरे यांची फेरनिवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री सदाशिव पवार, माजी सरपंच शंकरराव यादव, माजी सरपंच तुकाराम कोळेकर, सोसायटीचे व्हाईस चेअरमन दिगंबर जाधव, राज महाडिक, देऊ निकम, बँक मॅनेजर खोत, कासेगाव चे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन सोसायटीचे सचिव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बालाजी यादव यांनी संस्थेचे अहवाल वाचन केले.
शिवसंकल्प सामाजिक बचत गट हा गेल्या तीन वर्षापासून कार्यरत असून तिन्ही वर्षी सभासदांना आम्ही कायमस्वरूपी लाभांश देत आलेलो आहोत 470 सभासदाची ही सोसायटी असून सर्व सभासद चालू बाकी आहेत. त्यामुळे शून्य असून शैक्षणिक तसंच सामाजिक लग्न समारंभ आरोग्य विषयक समस्या यासाठी प्राधान्य क्रमांक कर्ज दिले जातात व त्याची परतफेड अगदी अल्प व्याजामध्ये सभासदांकडून करून घेतले जाते. यामध्ये दवाखाना आणि लग्न समारंभ व शेतकरी यांना प्राधान्य आहे त्यामुळेच ही सोसायटी चांगल्या प्रकारे उत्तम विश्वास सभासदाचा संपादन करू शकल्याचं यादव यांनी आपल्या अहवाल वाचनात बालाजी यादव यांनी सांगितलं.
संस्थेची एकूण उलाढाल एक कोटीच्या पुढे असून सभासदांनी कर्ज मागणी केल्यास तात्काळ कर्ज पुरवठा करण्याचं संस्थेचे धोरण आहे, असं संस्था सचिव बालाजी यादव यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मण महाडिक यांनी केलं तर हनुमंत पवार यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकबर शेख, हरिभाऊ यादव, संतोष जाधव यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.