ज्येष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांना मातृशोक

shivrajya patra

 

सोलापूर : येथील थोरला मंगळवेढा तालीम प्रसिद्ध पीर बडा मंगलबेडा सवारीच्या मुजावर घराण्यातील रहिमतबी अल्लाबक्ष मुजावर  यांचं सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या मृत्यूसमयी ८६ वर्षीय होत्या.

दिवंगत रहिमतबी मुजावर यांच्या पार्थिवाचा दफनविधी रात्री नऊ वाजता अक्कलकोट रस्त्यावरील जडेसाहेब मुस्लीम कब्रस्तानात होणार आहे.

त्यांच्या पश्चात तीन पुत्र, दोन कन्या, सुना, नातवंडे, पणतू, खापर पणतू असा मोठा परिवार आहे. खापर पणतुंना पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. 'लोकसत्ता ' चे वरिष्ठ प्रतिनिधी एजाजहुसेन मुजावर यांच्या त्या मातोश्री होत.

To Top