सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
यावेळी त्यांच्यासह त्यांच्या काही जवळच्या साथीदारांनीही शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. याप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी खासदार राहुल शेवाळे हेदेखील उपस्थित होते.