सोलापूर : ग्लोबल एज्युकेशनल अँड हेल्थ ऑर्गनायझेशन च्यावतीने सोलापूर शहराजवळ दक्षिण सोलापूर तालुक्यात वळसंगजवळ मायनॉरिटी युनिव्हर्सिटीची उभारणी करण्यात येणार आहे. या विद्यापीठाचा पायाभरणी सोहळा रविवारी, 03 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलाय. या निमित्ताने अल्पसंख्यांक समाजातील शैक्षणिक समस्यांचा उहापोह करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण समन्वय परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती या विद्यापीठाचे मुख्य प्रवर्तक आसिफ इकबाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मागील अनेक वर्षांपासून अल्पसंख्यांक समाजातील शिक्षणाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. बालमजूर, शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत चाललीय. सुविधा नसल्याने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होत चाललंय. या सर्व समस्यांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांकांच्या शैक्षणिक विकासाचं उद्देश नजरेसमोर ठेऊन एशियन मायनॉरिटी विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे.
या विद्यापीठाची दिशा व त्याची गरज स्पष्ट करण्यासाठी सोलापूर शहरात 03 नोव्हेंबरला दिवसभर ‘अल्पसंख्यांक शैक्षणिक समन्वय परिषद’ घेण्यात येत आहे. या परिषदेसाठी उद्घाटक म्हणून यावेळी डॉ. जहीर काझी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे उमरैन महफूज रहमानी, माजी कुलपती जफर सरेशवाला, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस. एन. पठाण, सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एन. एन. मालदार, अजमेर दर्गाह ट्रस्टचे चेअरमन सय्यद सरवर चिश्ती, समीर सिद्दीकी, मुबारक कापडी, डॉ. ऐनुल हसन, डॉ. अफसर आलम, मुहम्मद अतिक अहमद, डॉ. अब्दुल कदीर, हसन चौगले, अमीर अली खान, प्रो. डॉ. गज़नफ़र अली, अली एम शम्सी, शाह आलम रसूल, एस. एन पठाण, मुश्ताक अंतुले, इक्बाल मेमन, मुहम्मद अली पाटणकर, मेहबूब कासार, डॉ. शहीद खोत, आमिर इद्रिसि, इक्बाल शेख, अमीर अंसारी, डॉ. अंजुम कादरी, मुफ़्ती ज़ैनुलआबेदीन, खालिद सैफउद्दीन उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठाचा पायाभरणी समारंभ सकाळी आठ वाजता वळसंग येथे होईल. त्यानंतर सोलापुरातील हेरिटेज लॉन येथे १० वाजता परिषदेस सुरुवात होईल. परिषद तीन सत्रात होणार आहे. 'आधुनिक शिक्षण गरज व आपली जबाबदारी' हे पहिले सत्र सकाळी ११ वाजता सुरु होईल. या सत्रात अलीगढ विद्यापीठाचे प्रा. सऊद आलम कास्मी, मेहमूद सिद्दीकी, खालीद सैफुद्दीन मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी २.३० वा. 'मुस्लिम शिक्षण संस्था – समस्या व उपाय' या विषयावर परिसंवाद होईल. या सत्रात शाह आलम रसुल,खालीद सैफुद्दीन, हे मार्गदर्शन करतील.
संध्याकाळी सहा वाजता जनसभा होईल. मौलाना आझाद विद्यापीठ, जोधपूरचे संस्थापक अतिक अहमद हे या जनसभेचे अध्यक्ष असतील. शिक्षणतज्ज्ञ मुबारक कापडी, समीर सिद्दीकी यांची खुली जनसभा होईल.
या परिषदेसाठी सोलापूर शहरातील नागरीकांनी आणि शिक्षणक्षेत्रात कार्यरत शिक्षक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावं, असे आवाहन प्रस्तावित विद्यापीठाचे मुख्य प्रवर्तक आसिफ इक्बाल, फारुक सय्यद, डॉ.कासिम इमाम, सरफराज अहमद, ग्लोबल एज्युकेशनल अॅन्ड हेल्थ आर्गनाइजेशन, एशियन सेंटर फॉर सोशल स्टडीज व मासिक गुलबुटे मुंबई च्यावतीने करण्यात आलंय.