मंगळवेढा : आमदार समाधान आवताडे यांच्या स्थानिक आमदार निधीतून बांधण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्याच सांस्कृतिक भवन (वारकरी भवन) या वास्तूचा लोकार्पण सोहळा रविवारी २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते, सेवानिवृत्त जिल्हा सत्र न्यायाधीश तथा वासकर फडाचे प्रमुख ह.भ.प. विठ्ठल वासकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.
या प्रसंगी वासकर फड प्रमुख ह.भ.प. गोपाळ अण्णा वासकर महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत चवरे महाराज, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा.चेअरमन बबनराव आवताडे, श्री दामाजी संस्थेचे आमदार समाधान दादा आवताडे यांच्या आमदार निधीतून साकारतंय.
यावेळी वारकरी भवन अध्यक्ष विष्णूपंत आवताडे, श्री संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक सिध्देश्वर आवताडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदिप खांडेकर, जि.प. बांधकाम उपविभागाचे उपअभियंता गिरीश वाघमारे, संत चोखामेळानगरचे सरपंच शिवाजी सरगर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अखिल भाविक महिला वारकरी मंडळाच्या जिल्हाध्यक्षा पार्वती आवताडे, अखिल भाविक वारकरी मंडळाचे विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर(माऊली) पंढरपूर ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गोरे, शिवकुमार कन्स्ट्रक्शनचे प्रविण उगाडे प्रयत्नशील आहेत.
या कार्यक्रमासाठी अखिल भाविक वारकरी मंडळ, वारी परिवार, उपसरपंच, सर्व सदस्य व समस्त संत चोखामेळानगर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभणार आहे.
श्री संत दामाजी मंदिर येथून संत चोखामेळा नगर येथे बांधण्यात आलेल्या वारकरी भवनापर्यंत सकाळी 10 वाजता दिंडी निघणार आहे. या दिंडीस सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.