सोलापूर : सोलापूर शहर जेलरोड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना भांबिष्टे यांनी आत्मसंरक्षण, आत्मविश्वास, कठीण प्रसंगात धैर्याचे महत्त्व, स्वत:चे व इतरांचे रक्षण करण्याची जबाबदारी, गुड टच-बॅड टच, पोलिसांची मदत व संरक्षण यासह विविध विषयावर विद्यार्थीनींना सुरक्षेसंबंधी विस्तृत मार्गदर्शन केले.
सोलापूर पोलीस आयुक्तालय व एम.ए.पानगल यांच्या संयुक्त विद्यमाने एम.ए.पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे "नईम शेख मेमोरियल हॉल" येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात पवित्र कुराण पठणाने झाली. यावेळी जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मुश्ताक नदाफ व जाधव मॅडम, निकहत नल्लामंदू, प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यानंतर अब्दुल रऊफ पटेल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान सर व निकहत नल्लामंदू मॅडम यांनी पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केले. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अब्दुल रऊफ पटेल यांनी केले.
प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शनपर भाषण सर्व विद्यार्थिनींनी लक्षपूर्वक समजून घेतले. त्यानंतर प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये विद्यार्थिनींनी विविध विषयावर प्रश्न विचारले, यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या समर्पक उत्तरांद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या इतिप्रसंगी फरजाना नदाफ यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ताफ सिद्दीकी, अकबर पठाण, मोहसीन माशाल, मेहमूद खतीब, इकबाल दलाल, कुलसूम दर्जी, नगमा मुजावर, जेबा शेख, इरम शेख, जवेरिया कांबले, सना मुल्ला आदींनी परिश्रम घेतले.