या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थीची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची निःशुल्क सोय करण्यात येणार आहे. केंद्रामध्ये प्रवेश मिळण्यासाठी उमेदवार हा कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस एक्झामिनेशन (सीडीएसइ-युपीएससी) अथवा नॅशनल डिफेन्स अॅकेडमी एक्झामिनेशन (एनडीए-युपीएससी) उतीर्णं झालेली असावी. त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावेत.
उमेदवार एनसीसी सी सर्टिफिकेट ए किंवा बी ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी. टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी (युनिर्व्हरसीटी इंट्री स्कीम) एसएसबी कॉल लेटर असावे किंवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे 04 ऑक्टोबर रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येण्यापूर्वी उमेदवारांनी डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे (डीएसडब्लू) यांचे संकेतस्थळ https://mahasainik.maharashtra.gov.in वर सर्च करुन त्यामधील एसएसबी 58 कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व परिशिष्ठांची प्रत पूर्ण भरून तीन प्रतीत सोबत घेऊन यावी.
तरी सोलापूर जिल्हयातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदांची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर रहावे. मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-58 कोर्ससाठी (किंवा संबंधीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्ठंची प्रिंटघेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.
अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ई मेल आयडी: training.potenashik@gmail.com व दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा भ्रमणध्वनी क्रं. 9156073306 वर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.