मोहोळ : अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटना सोलापूर यांच्या वतीने जि. प. प्रा. उर्दू शाळा गुलशननगर मोहोळ येथील तंत्रस्नेही, कर्तव्यदक्ष व आदर्श शिक्षक मेहमूद अन्सारी सर यांना उर्दू साहित्य अकादमी यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याप्रित्यर्थ त्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला.
यावेळी मोहोळ केंद्राचे केंद्रप्रमुख सुरेश पवार,
हजरत शेख (जिल्हा सरचिटणीस, अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटना सोलापूर), धर्मराज चवरे (शिक्षक समिती जिल्हा कोषाध्यक्ष), सुधीर मोटे (मोहोळ तालुका सरचिटणीस शिक्षक समिती), राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष आयाज सुर्खी, तसेच मिनिटे सुर्खी, वाहिद मिर्झा, इरफान मिर्झा, शमिर तांबोळी सर व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.