Type Here to Get Search Results !

' एनटीपीसी ' मध्ये हिंदी दिवस आणि स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन


सोलापूर : कार्यालयीन कामकाज तसेच दैनंदिन दळणवळणात राजभाषा हिंदीचा व्यापक प्रचार करण्याच्या उद्देशानं शनिवारी, १४ सप्टेंबर एनटीपीसी लिमिटेड, सोलापूर येथे हिंदी दिन आणि स्वच्छता पखवाड्याचं सोलापूर एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंदोपाध्याय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 



एनटीपीसी लिमिटेड, सोलापूर येथे १४ ते २९ सप्टेंबरदरम्यान हिंदी पंधरवडा आणि सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छता पंधरवड्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उद्घाटन कार्यक्रमास वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



सोलापूर एनटीपीसीचे मुख्य महाव्यवस्थापक तपन कुमार बंदोपाध्याय यांनी हिंदी दिन सोहळ्याचे उद्घाटन केले आणि सहभागींना ‘राजभाषा शपथ’ आणि ‘स्वच्छता प्रतिज्ञा’ देण्याबरोबरच हिंदी आणि स्वच्छता पंधरवडा सुरू करण्याची घोषणा केली. त्यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना अधिकृत वापरात हिंदीचा प्रचार करण्याचे आवाहन केले. त्यांनी स्वच्छतेच्या महत्त्वावर भर देत प्रत्येकाने दैनंदिन जीवनात एकेरी वापराच्या प्लास्टिकचा वापर न करण्याचे आवाहन केले. 



CGM, सोलापूर आणि इतरांनी अधिकृत भाषेतील आवाहन जारी केले अन् प्रत्येकाला त्यांच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजात शक्य तितकी अधिकृत भाषा हिंदी वापरण्यास सांगितले. ते म्हणाले की, हिंदी भाषेमध्ये सर्व भाषांना एकत्र जोडण्याची अफाट शक्ती आहे, त्याशिवाय ती बोलणे आणि प्रत्येकाशी जोडणे सोपे आहे.



पंधरवड्यादरम्यान हिंदी प्रश्नमंजुषा, नारा लेखन, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा इत्यादी स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. वार्षिक राजभाषा कार्यक्रम आणि स्वच्छता पखवाड्यात कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मुलांसह सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे.