सोलापूर : येथील स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या मध्यवर्ती मंडळाच्यावतीने मंगळवारी, १७ रोजी अनंत चतुर्दशी दिवशी श्रींच्या विसर्जनाची मिरवणूक प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य लेझीम ढोल पथक ताफ्यासह वाजत गाजत निघते. या मध्यवर्तीचे वैशिष्ट्य प्रारंभी देशमुखांच्या मानाची श्रींच्या पालखीसह सर्वात शेवट श्रध्दानंद समाजाचा आजोबा गणपती यामध्ये सहभागी होणाऱ्या इतर मंडळास येणाऱ्या समस्यांसंदर्भात ट्रस्टी अध्यक्ष बसवराज येरटे व उत्सव अध्यक्ष विनायक महिंद्रकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हाॅटेल ऐश्वर्या येथे बैठक पार पडली.
या बैठकीत सुमारे १८ मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहुन अडचणी मांडल्या, तसेच लवकरात लवकर सहभागी होऊन मानाचा आजोबा गणपती मध्यरात्री १२ वा. पर्यंत शक्यतो विसर्जन होण्यासंदर्भात प्रयत्नशील राहू, असे मत व्यक्त केले.
या बैठकीत ट्रस्टी सुनील रसाळे, दास शेळके, संजय शिंदे, गौरव जक्कापुरे, भाऊ रोडगे, माजी अध्यक्ष अमोल शिंदे यांच्यासह इतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विचार मांडले.
या बैठकीस माजी आमदार ट्रस्टी नरसिंग मेंगजी, श्रीशैल बनशेट्टी, विजय पुकाळे, अनिल गवळी, माजी अध्यक्षा श्रीमती लता फुटाणे, सोमनाथ मेंडके, उत्सव उपाध्यक्ष चक्रपाणी गज्जम, चिन्मय पाटील, संतोष खंडेराव, मल्लिनाथ सोलापुरे, विजयकुमार बिराजदार, प्रसिध्दी प्रमुख शिवानंद येरटे, यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.