सोलापूर : सुप्रसिद्ध साहित्यिका, पत्रकार अन् सामाजिक कार्यकर्त्या सौ. सायली सचिन जवळकोटे यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने सोमवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. त्यांच्यावर दुपारी वीरशैव लिंगायत रुद्रभूमी, रूपभावानी रोड इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या मृत्यूसमयी ५४ वर्षीय होत्या.
त्यांनी आजपर्यंत संचार, लोकमतसाठी लिखाण केले. आकाशवाणी अन् आजतक चॅनेलसाठीही काम केले. ‘लोकमत सोलापूर’ चे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्या त्या धर्मपत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून, जावई अन् दोन नातवंडे आहेत.