सोलापूर : उद्याच्या भावी पिढ्यांसाठी प्राथमिक शिक्षण म्हणजे मूळ शिक्षण आहे. मुलंच पालकांची मूळ संपत्ती आहे. ती सक्षम होण्यासाठी त्यांच्या प्राथमिक शिक्षणाकडे पालकांनी प्रारंभापासून लक्ष देणे गरजेचे आहे, असं प्रतिपादन डॉ. इस्माईल शेख यांनी केले.
शिवछत्रपती रंगभवन जवळील समाज कल्याण केंद्रात अब्दुल्ला क्लासेसच्यावतीने विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त अब्दुल्लाह क्लासेसच्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आदर्श शिक्षिका तरन्नुम काखंडीकर, उझमा हुंडेकरी, मदिहा शाहपुरे, ताहा सय्यद, रेश्मा शेख आणि मिसबाह दुर्गकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे सुप्रसिद्ध एम. डी. डॉ. इस्माईल शेख होते.
कार्यक्रमाची सुरुवात अब्दुलाह क्लासेसच्या विद्यार्थी इब्राहिम शेख यांनी पवित्र कुराणच्या पठणाने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले, ज्याला पाहुण्यांनी भरभरून दाद दिली.
सोशल उर्दू शाळेचे सुपरवायझर यास्मीन शेख, ज्येष्ठ शिक्षिका समीना मनियार आणि सुप्रसिद्ध सूत्रसंचालक अजहर चितापुरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. इस्माईल शेख यांनी पालकांना सांगितले की, मुलांचे भवितव्य त्याच्या सुरुवातीच्या सात वर्षांतच ठरवले जाते, त्यानंतरच मुलाला त्याबद्दल अधिकाधिक माहिती प्राप्त होत राहते. त्यामुळे प्राथमिक स्तरावर मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी पालक व मुलांमध्ये वाचण्याची आवड निर्माण झाली पाहिजे तर मुलांवर चांगले संस्कार घडवण्यासाठी सतर्कतेने काम करणे खूप गरजेचे असल्याचे अन्य मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन अब्दुल्ला क्लासेसचे प्रभारी शेख मुईज अहमद यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तरन्नुम काखंडीकर, उझ्मा हुंडेकरी, मादीहा शाहपूरे, ताहा खानम सय्यद, रेश्मा शेख, मिस्बाह दुरूगकर, सानिया शेख, इरफान पटेल, साकिब नाईकवडी, जमीर मुलाणी व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.