कासेगांव / संजय पवार : ग्रामीण भागातील युवक शिक्षणाच्या माध्यमातून मोठ्या पदावर गेला पाहिजे. या गावातील कोणी डॉक्टर, वकील तर कोणी इंजिनियर होऊन गावच्या विकास कामांमध्ये हातभार लावला पाहिजे, तरच आपण जे उत्सव साजरे करतो ते सार्थक होतील, असं प्रतिपादन सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी केले.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या गणेशोत्सव गणपती पूजेसाठी सोलापूरचे माजी उपमहापौर नाना काळे, सकल मराठा समाज सन्मयक माउली पवार, परिवहन चे माजी सभापती राजन जाधव, प्रा. संजय जाधव, प्रा. जीवन यादव, प्रा. शिवाजीराव चापले, तामलवाडीचे सरपंच पाटील, डॉ. प्रवीण खारे, उळेगांवचे उपसरपंच नेताजी खंडागळे आले होते. त्यांच्या हस्ते उभय मंडळाच्या गणपती मूर्तींचं पूजन करण्यात आले.
यावेळी गावातील विविध भागात सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. प्रवीण खारे व इतर सामाजिक विषयामध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माजी उपमहापौर काळे, मराठा समन्वय माऊली पवार, राजन भाऊ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सकल मराठा समन्वयक माऊली पवार बोलत होते.
यावेळी पवार यांनी शिक्षणाची गरज, आजची शिक्षण पद्धती आणि युवकांसमोरील आव्हानं यावर मार्गदर्शन केले. राजन जाधव यांनीही आपल्या मनोगतात, अजून शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यम तसेच मराठी माध्यमाचा वापर करून मोठ्या पदावर जाणे अपेक्षित आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग कसा सरस आहे, हेही सिद्ध करण्याची हिच वेळ असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष लखन चिलदारे, राम चौगुले, उपसरपंच ज्ञानेश्वर रोकडे, केदार ढेकळे, प्रमोद उपाख्य सरकार पाटील, संजय पवार, रणजीत चौगुले, विश्वजीत चौगुले, सुधाकर शिंदे, सचिन गरड, प्रदिप माने, महेश भोज, श्रीकांत पवार यांच्या हस्ते निमंत्रीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे पदाधिकारी भैरु चिलदारे सुमित ननवरे, घाडगे मोहन रेड्डी, लहू गरड, अशोक माने, गणेश राऊत, अभिमन्यू माने, अल्लाउद्दीन शेख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.