दि प्रोग्रेसिव्ह उर्दु हायस्कूलमध्ये हिंदी दिवस साजरा
सोलापूर : प्रत्येक क्षेत्रात हिंदी अनिवार्य असून तिचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे. यासाठी हिंदी भाषेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी फक्त कला शाखेचे विद्यार्थीच नव्हे तर विज्ञान शाखेचे विद्यार्थी देखील हिंदी हा विषय निवडावा. यातून आपलं करिअर घडवावा आणि महात्मा गांधीचे स्वप्न साकार करावे, असं आवाहन मुख्याध्यापक अ. गफूर सगरी यांनी केले.
येथील दि प्रोग्रेसिव्ह उर्दू हायस्कूलमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही हिंदी दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक अ. गफूर सगरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
हिंदी भाषेचे महत्त्व सांगताना विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात आपले करिअर निवडताना हिंदी विषय अतिशय महत्त्वाचे आहे, असंही मुख्याध्यापक अ. गफूर सगरी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शेवटी सांगितले.
यावेळी हिंदी दिवसाचे औचित्य साधून महेरुफा शेख, आलमास ईनामदार, फरीजा बिजापूरे, पठाण नुरुलसबा, आल्फिया फिरजादे, महेविश शेख, नुरैन फातिमा शेख व अब्दुल करीम शेख या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख म्हणून सरदार नदाफ त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात हिंदी भाषेची राष्ट्रभाषा म्हणून ते संपर्क भाषा म्हणून केलेला प्रवास व अनेक लेखक, कवी यांचे हिंदी भाषेसाठी योगदान आणि हिंदी भाषेचा प्रवाह किती मोठा आहे यावर आपले विचार मांडले.
हिंदीच्या शिक्षिका सौ. मेहरून सय्यद यांनी हिंदी भाषेचा गोडवा यावर भाष्य केले. प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. सादेका बारागजी यांनी हिंदी आणि उर्दु भाषेचे अतूट नाते आहे जसे आई आणि मावशीचे नाते असते हे विषद केले.
याप्रसंगी मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून रोख रक्कम दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी आदिना तसकिन चौधरी यांनी केले तर प्रशालेचे शिक्षक अयाज शेख यांनी आभार प्रदर्शन केले.