सोलापूर : शहर-जिल्ह्यातील कृती समितीतील सर्व सदस्यांचा स्नेह मेळावा विजापूर रस्त्यावरील हॉटेल फानुस येथे रविवारी संपन्न झाला. यामध्ये कृती समितीचे खजिनदार रजाक मुजावर यांच्यावतीने स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृती समितीच्या वतीने रजाक मुजावर यांचा अब्दुल पठाण व आप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते फेटा शाल व हार घालून सत्कार करण्यात आला.
कृती समितीच्या स्नेह मेळाव्यात पत्रकार क्षेत्रातील ज्येष्ठ पत्रकार शाहजहान अत्तार, प्रमुख सल्लागार यशवंत पवार, मिलिंद प्रक्षाळे, अशोक ढोणे या सर्वांनी पत्रकारांशी निगडित सर्व समस्यावर आपले मौलिक मार्गदर्शन देऊन संघटनेसोबत खंबीरपणे उभे राहून संघटना बळकट करू, असे विचार व्यक्त केले.
कृती समितीचे युनुस अत्तार, डी. डी. पांढरे, शब्बीर मणियार, लतीफ नदाफ यांनी सुद्धा पत्रकारावर येणाऱ्या कटू प्रसंगाबाबत व अडचणीबाबत आपले मनोगत मांडले.
यावेळी उपस्थितामध्ये प्रसाद जगताप, इरफान मंगलगिरी, इस्माईल शेख, मुस्ताक लालकोट, कलीम पटेल, रफिक शेख, आसिफ शेख, अक्षय बबलाद, सोहेल मुजावर, असलम नदाफ, अकबर शेख, अश्फाक शेख, हाजी फैयाज शेख, जावेद शेख, मुसा अत्तार इत्यादी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.
कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण यांनी सूत्रसंचालन करून शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.