Type Here to Get Search Results !

फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात पुणेरी व्यापाऱ्याची सुमारे सव्वा कोटी रूपयांची फसवणूक; गुन्हा दाखल

 

सोलापूर : सोलापुरातील बड्या अपार्टमेंटमधील फ्लॅट खरेदी-विक्रीच्या व्यवहारात खरेदीदार पुणेरी व्यापाऱ्याची सुमारे सव्वा कोटी रूपयांची फसवणूक झालीय. हा प्रकार नोव्हेंबर २०२० ते आजतागायत घडलाय. शैलेंद्र किसन गायकवाड (वय-५१ वर्षे) असं फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचं नांव आहे. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार अमित अशोक थेपडे याच्यासह दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती की, मजरेवाडी हद्दीत पुणेस्थित अमित अशोक थेपडे यांनी
गॅलेक्सी पनाश या नावाने रहिवासी फ्लॅट व व्यापारी दुकानगाळे विक्री करण्याचा प्रकल्प चालू करून गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील दुकान गाळा क्रमांक २१ हा शैलेंद्र किसन गायकवाड (रा- ए/३०१ ओपुला २४ के : विशाल नगर, पिंपळे निल्ख, पुणे) यांना खरेदी देऊन जूनन २०२१ पर्यत ताबा देतो, असं सांगून त्यांच्याकडून ४५ लाख रूपये रक्कम घेऊन रजिस्टर साठेखत लिहून दिले.

त्यानंतर गॅलेक्सी पनाश हा प्रकल्प जलदगतीने विकसीत करण्यासाठी शैलेंद्र गायकवाड यांचकडून आणखी १५ लाख रूपये रक्कम घेतली. अशा स्थितीत त्यांना दिलेल्या मुदतीत गाळा क्र. २१ व रक्कम १५ लाख रुपये परत न देता त्या बदल्यात गायकवाडकडून आणखी ४.५८ लाख रूपये घेऊन गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील रहिवासी फ्लॅट : क्र १२०१ व १२०२ असे ०२ फ्लॅट ६४ लाख रुपयांमध्ये खरेदी देतो, असे सांगून ३१ डिसेंबर २०२२ रोजी पर्यत दोन्ही रहिवासी फ्लॅटचा ताबा देतो, असे सांगून त्यांनी आजपर्यत फिर्यादीकडून घेतलेली रक्कम किंवा दोन रहिवासी फ्लॅटचा ताबा दिला नाही.

याशिवाय अमित अशोक थेपडे २) सौ. मोनाली अमित थेपडे (रा-पुणे) या  दाम्पत्याने गायकवाड यांना विश्वासात घेऊन सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून आणखी १९ लाख रूपयांची रक्कम घेतली. अशाप्रकारे  ८३,५८,००० रूपये इतकी रक्कम घेतली. आरोपीतांनी वेळोवेळी फिर्यादीकडून बँकेमार्फत स्वीकारून त्याबदत्यात त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही.

थेपडे दाम्पत्याने फ्लॅटचा ताबा दिला नाही, याउलट त्यांनी फिर्यादीकडून घेतलेल्या ८३, ५८, ००० रूपये रकमेच्या बदल्यात वर नमुद केलेप्रमाणे विविध व्याजदरानुसार १,२५,३०,५०० रुपये देतो असे सांगून ५०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र रजिस्टर नोटरीने लिहून देऊन न वटणारा मनोरमा को. अॅप बँक लि. सोलापूर या बॅकेचा धनादेश देऊन सव्वा कोटी रुपयांची फसवणूक केली.

याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलिसांनी थेपडे दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक तरंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.