सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सेवादल महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने 09 ते 15 ऑगस्ट दरम्यान "सेवा सप्ताह" साजरा करण्यात येणार आहे. सेवा सप्ताह निमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने सांगली शहरातील तुळजाईनगरमध्ये सेवादलाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते शुक्रवारी, ०९ ऑगस्ट रोजी वृक्षारोपण करुन सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादाल तथा ग्राहक संरक्षण समितीचे महालिंग हेगडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे, सेवादल सांगली शहराध्यक्ष दत्ता पाटील, मिरज सेवादल अध्यक्ष जमीर खान, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष जुबेर मुजावर, सेवादल शहर जिल्हा संघटक विनायक बलोलदार, सेवादल संघटक सचिव संतोष शिंदे, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीचे मिरज शहर अध्यक्ष डॉ. किशोर चंदनशिवे, सामाजिक न्याय विभागाच्या सांगली शहर अध्यक्ष सुरेखा सातपुते, माजी नगरसेविका विद्या कांबळे, आदर्श कांबळे, अभिजित रांजणे, संजय सातपुते आदी पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.