Type Here to Get Search Results !

शालेय कुस्ती स्पर्धेत एम. ए. पानगल प्रशालेस विजेतेपद


काझी मोहम्मद जकवान मुजाहिद सुवर्ण पदकाचा मानकरी

 सोलापूर : सोलापूर महानगरपालिका व सोलापूर जिल्हा कुस्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, ११ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण कुस्ती केंद्र, सोलापूर येथे आंतरशालेय कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. त्यात एम. ए. पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. ९७ किलो वजन गटात काझी मोहम्मद जकवान मुजाहिद ने प्रथम क्रमांक पटकाविला, अब्दुल रहमान बागवान ने द्वितीय क्रमांक तर अयान बागवान या विद्यार्थ्याने  विविध गटात तिसरा क्रमांक पटकाविला.


काझी मोहम्मद जकवान मुजाहिद ने गेल्या तीन वर्षापासून शहर-जिल्हा व विभाग स्तरावर सुवर्ण पदक पटकाविले तर शालेय राज्य व फेडरेशन स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. या खेळाडूंनी गेल्या तीन वर्षात ११ पदकांची कमाई केली. 


प्रशालेस मिळालेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉ. हरून रशीद बागबान, उपमुख्याध्यापिका डॉ. सुरय्या परविन जहागीरदार, निकहत  नलामंदू, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, पालक-विद्यार्थी आदींनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. प्रशालेचे क्रीडा शिक्षक अल्ताफ सिद्दिकी, नावेद मुनशी व इक्बाल दलाल सर यांचे मार्गदर्शन लाभले. 


या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविलेल्या काझी मोहम्मद जकवान मुजाहिदचे सर्वत्र कौतुक होत आहे.