Type Here to Get Search Results !

दिलीपराव माने विद्यालयाचा मुलींचा हॉलीबॉल संघ विजयी; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड


उत्तर सोलापूर : तालुकास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत होनसळ येथील दिलीपराव माने विद्यालयाचा 17 वर्षे वयोगट मुलींचा संघ विजयी झाला. या संघाची जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

मुलींच्या संघात कर्णधार नम्रता जाधव, दीक्षा कासे, सबिया शेख, हिंदवी साबळे, संचिता कांबळे, वैभवी भोसले, स्नेहल पवार, समीक्षा डोके, स्नेहल साबळे, प्रतीक्षा कांबळे, सानिका नागणे, अमृता जाधव यांना क्रीडा शिक्षक अश्फाक अत्तार, धर्मदेव शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. 

संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, सभापती रजनी भडकुंबे, हगलूर चे उपसरपंच प्रगती भडकुंबे, मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, उमेश जगताप सचिन नाईकनवरे, अख्तर सय्यद, विनोद राऊत, तात्यासाहेब तांबे, सुधाकर पवार, सुप्रिया पवार, शशिकांत गायकवाड शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केलं आहे.