सोलापूर जिल्ह्याचे अमृत सरोवरमधील काम उत्कृष्ट; अशाच पद्धतीने अन्य कामे करण्याचे आवाहन
सोलापूर : जिल्ह्यात जलशक्ती अभियाना अंतर्गत नारीशक्तीचे जलशक्ती हे ब्रीद घेऊन मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे कामे करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने विविध कामाचा संपूर्ण जिल्ह्याचा एक शास्त्रीय पद्धतीने आराखडा सादर करण्याबाबत केंद्रीय नोडल अधिकारी राकेश कुमार मीना यांनी जलसंधारण विभागाला सुचित केले आहे.
जिल्ह्यात जलसंधारण विभागांने अमृत सरोवर योजनेअंतर्गत दिलेल्या ७५ सरोवर दुरुस्तीच्या कामाव्यतिरिक्त खूप मोठ्या प्रमाणावर कामे करून अनेक जुनी सरोवरे पाणी साठवण योग्य केलेली आहेत. त्यातील अनेक कामांची पाहणी केंद्रीय नृढ अधिकारी मीना व केंद्रीय तांत्रिक अधिकारी श्रीमती पुर्णिमा बाराहाते यांनी करून या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
याच पद्धतीने सर्व जलसंधारणाचे कामे पूर्ण केल्यास सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंवर्धन होऊन पुढील काळात हा जिल्हा जलयुक्त होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या पाहणी दौऱ्यात जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा व जलसंधारण विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.