Type Here to Get Search Results !

प्रथमच दुर्मिळ घरगुती वनस्पतींचे प्रदर्शन


सोलापूर : आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लीली नर्सरी, सोलापूर यांच्या वतीने वृक्ष प्रेमींसाठी दुर्मिळ शोभिवंत वनस्पतींचे प्रदर्शन श्रावण सरी दिनांक १५ ते १९ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संयोजक त्रिभुवन जयंतराव जक्कल यांनी दिली. 

सोलापूर शहरात गेली अनेक वर्षापासून लिली नर्सरी कार्यरत असून यापूर्वीही अशी वेगवेगळी प्रदर्शने आयोजित केलेली आहेत. सोलापूरकरांना दुर्मिळ घरगुती अशा शोभिवंत वनस्पती ची माहिती व्हावी, या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

विविध रंगीबेरंगी फुलझाडे, पानांची रचना, आकर्षक रंगसंगतीची पाने तसेच नासाने प्रमाणित केलेल्या घरातील हवा शुद्ध करणाऱ्या कमी पाण्यावर जगणाऱ्या अनेक वनस्पती जसे संस्वेरिया , फर्न, पिस लिली, मनी प्लांट, स्पायडर प्लांट, झामिया कुल्कस, एग्लोनेमा अशा अनेक नवीन वनस्पती पहावयास मिळतील. 

कमी पाण्यावर वाढणाऱ्या आणि उन्हाळ्यात टिकून रंगीत फुले देणाऱ्या अडेनियम प्रजाती तसेच रंगीबेरंगी फुलांचे कलेंचो हे विशेष या प्रदर्शनाचे आकर्षण असेल. घरात प्रदर्शन करता येतील, असे दुर्मिळ कॅक्टस आणि सेक्युलंट हेही या प्रदर्शनातील आकर्षण आहे. छोटे लघु वृक्ष बोन्साय या निमित्ताने पहावयास मिळतील. वृक्ष प्रेमींना वृक्ष संगोपना विषयी विशेष मार्गदर्शन देखील प्रदर्शनात केले जाणार आहे.

पर्यावरण सेवाभावी आत्मकला बहुउद्देशीय संशोधन संस्था व लिली नर्सरीज सोलापूर यांनी हे प्रदर्शन आयोजित केले असून सकाळी १० ते रात्री ०८ या वेळेत समाचार भवन, ३४० शुक्रवार पेठ, समाचार चौक, सोलापूर येथे सोलापूरकरांना नि:शुल्क हे प्रदर्शन पाहावयास मिळणार आहे. 

वृक्षप्रेमी संघटना विविध सामाजिक संघटना शालेय विद्यार्थी तसेच पर्यावरणात काम करणारे सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी या प्रदर्शनास जरूर भेट द्यावी, माहिती घ्यावी, असे आवाहन संयोजक त्रिभुवन जयंतराव जक्कल यांनी केलं आहे.

Lili Nurseries

Samachar Bhavan, 340, Shukrawar Peth, Solapur 413002 mobile 9049995772