Type Here to Get Search Results !

सिद्धार्थ शिरसट याचा महाराष्ट्र उद्योग भूषण पुरस्काराने गौरव


सोलापूर : येथील तरुण कलावंत सिद्धार्थ सचिन शिरसट याला पुण्यातील बाणेर येथे आयोजित एका कार्यक्रमात महाराष्ट्र  उद्योग भूषण पुरस्कार देऊन मराठी अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या हस्ते नुकतेच गौरविण्यात आले.



नूतन उद्योजकांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योजकांना या पुरस्काराने प्रतिवर्षी गौरवण्यात येते. सिद्धार्थ शिरसट याने सोलापुरात दहावी पूर्ण करून पुण्यात कलेचे शिक्षण घेतले आहे. तेथे त्याने सिद्धार्थ आर्ट ग्रुप तयार केला. त्याचे प्राथमिक सिद्धार्थ आर्ट ग्रुप या नावाने तो कार्य करीत आहे. 


लँडस्केप. पोट्रेट. वॉल पेंटिंग अकॅडमी याद्वारे सामाजिक काम सुरू आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याला बेस्ट पेंट आर्टिस्ट ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.