आसिफ इक्बाल यांची सुपर अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीच्या चेअरमनपदी निवड
सोलापूर : आजतागायत सुपर अर्बन को-ऑप. क्रेडीट सोसायटीने जी परंपरा राबविली आहे ते पुढेही कायम राहील. कर्ज मर्यादा वाढविण्यात येईल. सर्व सभासदांना हक्काचे घर व्हावे यासाठी विशेष प्रयत्न केले जाईल. संस्थेला आत्याधुनिक तंत्रज्ञाने जोडून सर्व सभासदांना ॲपद्वारे आपल्या खात्याची माहिती देण्याची सुविधा व इतर बँकेच्या सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देऊ, असं आसिफ इक्बाल यांनी सांगितले.
येथील सुपर अर्बन को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या चेअरमनपदी सोलापूर सोशल प्रायमरीचे मुख्याध्यापक आसिफ इक्बाल यांची निवड एकमताने करण्यात आली. ही संस्था गेल्या अठ्ठावीस वर्षापासून सहकारी पतसंस्था क्षेत्रात आपल्या सभासदांना आदर्श सेवा देत आहे. सभासदांना इतर पतसंस्था व बँकांप्रमाणे व्याज न घेता फक्त सर्व्हिस चार्ज घेऊन सभासदांना कर्ज पुरवठा करित आहे.
यावर्षी पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेत सोलापुरातील सामाजिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणारे आसिफ इक्बाल यांची संस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माळवते चेअरमन अ. गनी चितापुरे व इतर संचालकांनी पुष्पहार घालून आसिफ इक्बाल यांचा सत्कार केला. प्रारंभी सचिव इक्बाल धोटेकर यांनी पतसंस्थेचा अहवाल वाचून पतसंस्थेची सविस्तर माहिती दिली. यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन आसिफ इक्बाल बोलत होते.
या सभेत दिवंगत चेअरमन म. फारूख शेख यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अय्युब नल्लामंदू, मुश्ताक इनामदार यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी ॲड. अतिक वड्डो, सीए मौलाना शेख, जुबेर शेख, म. शरीफ जमादार, हाजी अ. सत्तार दर्जी, फरजाना हन्नुरे, नसीम बानो धोटेकर, अ. मजीद धोटेकर, अनिस दुरुगकर, दस्तगीकर शेख, अ. समी सय्यद, बाळकृष्ण इंगळे, सुहेल शेख, आकीद शेख, समीर निचलकर, इरफान पटेल, जमीर मुलानी, मुईज शेख, मुश्ताक गदवाल आदी सभासद उपस्थित होते.