ईश्वर वठार : बंधुभावाच्या नात्याची वीण अधिक घट्ट करणाऱ्या रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी ईश्वर वठार गावात अनोखा कार्यक्रम घेण्यात आला. सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पॅनल प्रमुख यांना राख्या बांधत मायेचा आधार दिला. यावेळी माता-भगिनी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्यामार्फत सर्व माता-भगिनींना भेट म्हणून व पर्यावरण संतुलन राहावे, यासाठी प्रत्येकी एक रोपटे भेट देण्यात आले.
लोकनेते गोपीचंद पडळकर फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या धर्तीवर सरपंच माझी लाडकी बहीण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बहिण भावाचे नाते जपणारा पवित्र सण 'रक्षाबंधन" चे औचित्य साधून ईश्वर वठार मध्ये "सरपंच लाडकी बहीण" या संकल्पनेतून ग्रामपंचायत ईश्वर वठार इथं रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
गावातील महिला भगिनींनी सरपंच नारायण देशमुख, उपसरपंच विजय मेटकरी, भाजप किसान मोर्चाचे माऊली हळणवर, ग्रामपंचायत सदस्य भारत पांढरे, अर्जुन घोडके, बाळासाहेब खांडेकर, राष्ट्रीय समाज पक्षाचे पंकज देवकते, म्हाळापा खांडेकर, अजय देशमुख यांना राखी बांधून बहीण भावाचे नाते जपून एक आदर्श उपक्रम पार पाडला. .
यावेळी युवराज देशमुख, हनुमंत लवटे, सुरेश खरात, बाळासाहेब खांडेकर , महेश सरवदे माऊली गुंडगे, डॉ. तानाजी खांडेकर, धनाजी देशमुख, अशोक तरंगे,प्रशांत लवटे, धनाजी सरवदे , सुनील तरंगे, बापू बोरकर, हा कार्यक्रम घेण्यासाठी लोकनेते गोपीचंद पडळकर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष माऊली भाऊ हळणवर, अशोक तरंगे, धनाजी देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी ईश्वर वठार मधील माता-भगिनी उपस्थित होत्या.