सोलापूर : मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील बसवेश्वर मंदिरात सुरु असलेल्या बसवदर्शन प्रवचन मालेमधील एक भाग अक्कमहादेवी व अल्लम प्रभू यांचा अनुभव मंटप संवाद पूज्यश्री जगद्गुरु डॉ. चन्नबसवानंद स्वामीजी यांच्या दिव्य सान्निध्यात प्रवचनात सोलापूरच्या शंकर लिंग महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री थंलगे व ३० शरणीयांनी अक्कमहादेवी यांच्या जीवन चरित्रावर आधारित एक रूपक सादर केले.
या कार्यक्रमात राजेश्वरी थलंगे यांनी अक्कमहादेवी यांच्या रूपकात प्रमुख भूमिका साकारत उत्कृष्ट अभिनय केला आणि सुन्दर सादरीकरण केले. बोराळ गावातील सर्व ग्रामस्थांनी अक्कमहादेवी यांच्या रूपकाचा आनंद घेतला. दररोज संध्याकाळी सहा ते साडेआठ वाजेपर्यंत बसव दर्शन प्रवचन सुरू आहे, आणि पूज्यश्री जगद्गुरु चन्नबसवानंद स्वामीजी ३ सप्टेंबर रोजी प्रवचन देतील. या दिवशी प्रवचनाचा समारोप होईल, असंही सांगण्यात आले.
यावेळी जागतिक लिंगायत महासभेच्या राज्य कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे, जिल्हाध्यक्ष शिवानंद गोगाव, तालुका काँग्रेस महिला अध्यक्ष जयश्री कवचाळे, नागेंद्र कोगनुरे, खसगी, शिवराज कोटगी, विरुपाक्ष पटणे, सुरेश हुगार, अमोल म्हमाणे उपस्थित होते.