सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगांव येथील ह.भ.प. नरसू वाडकर यांच्या पत्नी सौ. पद्मिनी यांचं वृद्धापकाळात अल्पशः आजाराने सोमवारी निधन झालं. त्यांच्यावर वाडकर मळा येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय व वारकरी संप्रदायातील अनेक नागरिक उपस्थित होते.
त्या मृत्यूसमयी ७८ वर्षीय होत्या. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. दैनिक पुण्यनगरी चे पत्रकार शिवदास वाडकर यांच्या त्या मातोश्री होत.