लोकरत्न स्व. श्रीकांत (बप्पा) वाडकर जयंतीदिनी रविवारी विविध कार्यक्रमांचं आयोजन

shivrajya patra

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील कासेगांव येथे लोकरत्न स्व. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या ६५ व्या जयंती दिनानिमित्त रविवारी, ११ ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सकाळी ९ वा. भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सरपंच यशपाल वाडकर यांनी दिली.

लोकरत्न स्व. श्रीकांत (बप्पा) वाडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर आटोपल्यावर सायंकाळी ०६ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौकात,आयोजित कार्यक्रमात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय महामार्ग ते कासेगांव ३ कोटी, खडकी रस्ता २५ लक्ष, कासेगांव-वडजी रस्ता २.५० कोटी, कासेगांव-धोत्री रस्ता २.१९ कोटी, ब्रम्हनाथ तलाव दुरुस्ती - १० लक्ष, आरोग्य उपकेंद्र संरक्षण भिंत - ८ लक्ष, RO प्लॉट ११ लक्ष, जलजीवन मिशन- ८८ लक्ष, एल.ई. डी स्ट्रीट लाईट ७.४४ लक्ष आणि नवीन बुद्ध विहार बांधणे - १५ लक्ष अशा विविध विकास कामांचा भुमीपूजन व लोकार्पण करण्यात येणार आहे, असंही सरपंच यशपाल वाडकर यांनी सांगितले.

To Top