Type Here to Get Search Results !

महिला सन्मान व शिव्या मुक्त भारत; विविध सामाजिक शिक्षण महाविद्यालयांचे संयुक्त अभियान


सोलापूर/अनिकेत गायकवाड : महिला सन्मान अभियानांतर्गत सोमवारी, १२ ते २२ ऑगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्ट रोजी महिला सन्मान व शिव्यामुक्त भारत संदर्भात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती समाजकार्य विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा वाघमारे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर, नागपूर, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स समाजकार्य विभाग सोलापूर, अभिजीत कदम सोशल सायन्स इन्स्टिट्यूट समाजकार्य विभाग भारती विद्यापीठ, भाई छन्नुसिंह चंदेले कॉलेज ऑफ सोशल वर्क,सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सन्मान अभियानाचं आयोजन करण्यात आलं आहे.



सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी लिंगभाव सचेतना (Gender Sensitization) या विषयावर अभिजीत कदम सोशल सायन्स इन्स्टिट्यूट भारती विद्यापीठ,येथे विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, असं प्रारंभी प्रा. डॉ. निशा वाघमारे प्रारंभी म्हटले.

भारतीय स्वातंत्र्य दिनी गुरूवारी, १५ ऑगस्ट रोजी वालचंद शिक्षण समूहातर्फे वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ' महिला सन्मान व शिव्यामुक्त भारत ' अभियानासंदर्भात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात येणार असल्याचेही प्रा. डॉ. वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


हे अभियान यशस्वीतेसाठी वालचंद कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. संतोष कोटी, मासवे संघटनाचे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, समाजकार्य विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. निशा वाघमारे, भारती विद्यापीठाचे डॉ. डी. सी. कीर्तीराज व चंदेले कॉलेज ऑफ सोशल वर्कचे सिद्धार्थ गायकवाड प्रयत्नशील आहेत, असेही प्रा. डॉ. वाघमारे यांनी म्हटले.

२०, ऑगस्ट रोजी महिला सन्मान, महिलांचे घटनात्मक अधिकार, महिला व धर्म, महिला व पितृसत्ताक पद्धती, स्त्री-पुरुष समानता, महिला व त्यांचे मानसिक आरोग्य, महिलांचे योगदान व सद्यस्थितीतील समाजातील स्थान अशा वेगवेगळ्या विषयासंदर्भात एम एस डब्ल्यू विभागातील विद्यार्थी पोस्टर प्रेझेंटेशन करतील, २१ आणि २२ ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात सार्वजनिक ठिकाणी विद्यार्थ्यांमार्फत सामाजिक विषयांवर पथनाट्य सादर करण्यात येतील, असंही यावेळी सांगण्यात आले.