सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने ०९ ते १५ ऑगस्ट दरम्यान "सेवा सप्ताह" साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने पक्षाचे शहर-जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे यांच्या माध्यमातून मराठी मुलांची प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ओळखपत्र प्रदान करण्यात आले.
सेवा सप्ताहनिमित्त मंगळवारी, १३ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सांगली शहर जिल्ह्याच्यावतीने पक्षाचे शहर-जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे यांच्या माध्यमातून कवलापूर येथील मराठी मुलांची प्राथमिक शाळा क्र. ०२ याठिकाणी आज शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादलाचे शहर -जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे तसेच सेवादल पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ओळखपत्र प्रदान करून सेवा सप्ताह साजरा करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे महालिंग हेगडे, शहर -जिल्हा उपाध्यक्ष शीतल खाडे, सांगली शहर सेवादल अध्यक्ष दत्ता पाटील, सेवादल शहर जिल्हा उपाध्यक्ष जुबेर सेवादल, सेवादल शहर जिल्हा संघटक विनायक बालोलदार, अभियंता सेलच्या प्रदेश सरचिटणीस प्रणवी पाटील, तसेच कवलापुराच्या सरपंच सौ. उज्वला गुंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.वर्षा वायदंडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक.२ मुख्याध्यापिका श्रीमती अनुराधा सनगर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका, ऋषिकेश मोहिते (सामाजिक कार्यकर्ते), अविनाश मोहिते (सामाजिक कार्यकर्ते), अमोल भोरे (सामाजिक कार्यकर्ते), सचिनभाऊ कांबळे (चेअरमन, सिद्धेश्वर सेवा सोसायटी, कवलापूर), धर्मेंद्र मोहिते (सामाजिक कार्यकर्ते), वॉल्टर खाडे (सामाजिक कार्यकर्ते), सदाशिव दशरथ खाडे (माजी समाज कल्याण सभापती, जिल्हा परिषद सांगली), इंजि. प्रभाकर केंगार (उप विभागीय अभियंता, जलसंपदा विभाग, सांगली), इंजि.नामदेव कोरे (उप विभागीय अभियंता, जिल्हा परिषद सांगली), अनिल कोरे (अधिकारी, आकाशवाणी केंद्र, सांगली), तसेच शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-पालक आदी उपस्थित होते.