Type Here to Get Search Results !

मैत्री दिनानिमित्त मित्रांनी एकत्र येऊन केले वृक्षारोपण

 

सोलापूर : मैत्री दिनाच्या निमित्ताने यश महिंद्र ग्रीन सिटी यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यश महेंद्र ग्रीन सिटीचे संचालक सुयश खानापुरे आणि धीरेंद्र कपूर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. मैत्री दिनाच्या निमित्ताने दीड हजार वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आल्याचे सुयश खानापुरे यांनी सांगितले. 



अक्कलकोट रोड परिसरातील आसाराम बापू आश्रम परिसरामध्ये यश महिंद्र ग्रीन सिटी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी मैत्री दिनाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र येऊन वृक्षारोपण केले. वृक्षारोपणानंतर झाडांना फ्रेंडशिप बँड बांधण्यात आले. 



वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी डॉ. हर्षद वागज, वसुंधरा मित्र परशुराम कोकणे, इको फ्रेंडली क्लबचे समन्वयक अजित कोकणे, यश महेंद्र ग्रीन सिटीच्या संचालिका सोनाली खानापुरे, अंबादास कंदीकटला, अप्पू हनमशेट्टी, गुरू कापसे, महेश हिरेमठ, योगेश हिरेमठ, अप्पू पाटील, राहुल चंडक यांच्यासह इतर निसर्गप्रेमी उपस्थित होते.