सोलापूर : रक्तदान हे श्रेष्ठदान हे ब्रीदवाक्य घेऊन वैद्यकीय क्षेत्रात महात्मा बसवेश्वर ब्लड बँकेची सेवा सोलापूरकरांच्या आरोग्य क्षेत्रात गेल्या दोन वर्षापासून कार्यरत आहे. दरवर्षी बँकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत असतात. त्यात रूग्णवाहिका सेवेची भर पडतेय. ग्रामीण व शहरातील गरजू रुग्णाला अत्यंत माफक दरात ॲम्बुलन्स सेवा रुजू होत आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांनी केलंय.
यावेळी माजी मुख्य औषध निर्माण अधिकारी एम.एस. मुंडेवाडीकर, मंद्रूप ग्रामीण रुग्णालयाचे कार्यालयीन अधीक्षक माणिक कदम, ब्लड बँकेचे विद्यमान अध्यक्ष वैभव राऊत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष बापू पाटील व बंजारा समाजाचे युवा उद्योजक अशोक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ब्लड बँकेचे संचालक नागार्जुन जिंकले, सोमनाथ बिराजदार, विशाल कोळी, शिवा तुप्पद, टेक्निकल सुपरवायझर अश्विनी मनसावाले, जनसंपर्क अधिकारी रोहित बगले, नागेश पाटील आदी उपस्थित होते.