Type Here to Get Search Results !

जि. प. शाळा बिरोबा वस्ती येथे स्वातंत्र्य दिन साजरा; वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ लेकीने केलं गणवेशाचे वाटप


दक्षिण सोलापूर : तालुक्यातील कासेगांव येथील बिरोबा वस्ती जि. प. शाळा येथे ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण ह.भ.प. भारत चव्हाण व ग्रामपंचायतीच्या सदस्य सौ. सुरेखा चौगुले  यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाविषयी आपली मनोगते व्यक्त केली. व देशभक्तीपर गीतांचे गायन केले. सहशिक्षक राजशेखर बुरकुले यांनी स्वातंत्र्य दिनाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या कुसूम पवार यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते रणजीत चौगुले यांनी सांगितले की, जगात सर्वात जास्त विविध भाषा, विविध जाती-धर्म, पंथ आपल्या देशात असूनही सर्वजण एकत्र येऊन गुण्या-गोविंदाने नांदत आहेत. विविध जाती धर्म चे सण ही सर्व जण एकत्र येऊन साजरा करतात. कुसुम पवार यांचा आदर्श घेण्यासारखे आहे. दान करावे ही काही साधी गोष्ट नाही, तर गुण रक्तातच पाहिजे, असे मत व्यक्त केले. 






यावेळी लक्ष्मण पवार यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानाची जोड शिक्षक देतो आणि सामाजिक कार्य गावगाड्यातील शेतकरी, शेतमजूर करीत असतो. दानामध्ये श्रेष्ठ दान एक अन्न दान आहे व दुसरं वस्त्र दान आहे, याबद्दल मला खूप आनंद वाटतो की, कै. मनोहर अण्णा पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांची मुलगी, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या कुसूम पवार यांनी आपल्या कष्टातून गणवेश वाटप केले आहे. 

यावेळी ग्रामपंचायत सदस्य नारायण जाधव, सोसायटी माजी चेअरमन तुकाराम जाधव, संजय पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील आवताडे, गोविंद अवताडे, मोहन रेड्डी, वैष्णवी बरडे, लता शिंदे यांच्यासह अविनाश जाधव, नागनाथ शिंदे, शाकीरा आतार, प्रशांत चौगुले, दत्तात्रय यादव, समीर तांबोळी, स्वामी मॅडम, जाधव मॅडम, सौ. हेडे, ग्रामस्थ शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.  खाऊ वाटपाने या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमांचं सूत्रसंचालन राजशेखर बुरकुले यांनी केले तर पुरुषोत्तम कोळी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.