Type Here to Get Search Results !

दिलीपराव माने शिक्षण संकुलनात ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

उत्तर सोलापूर : तालुक्यातील होनसळ येथील दिलीपराव माने शिक्षण संकुलनात ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे लक्ष्मण भगळे (सेवानिवृत्त मुख्याधिकारी, नगरपालिका) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

याप्रसंगी राळेरासचे सरपंच नागनाथ माने, संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे, सभापती रजनी भडकुंबे, हगलूरच्या उपसरपंच प्रगती भडकुंबे, होनसळच्या सरपंच सविता गायकवाड, संस्थेचे उपाध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सचिव विकास बनसोडे, सहसचिव अमित भडकुंबे, अॅड. अविनाश बनसोडे, मारुती जाधव, दत्तात्रय भालेकर, राळेरासचे उपसरपंच कैलास कांबळे, पोलीस पाटील आकाश कांबळे, तात्या भोजरंगे, बापू खेडकर, अर्जुन साबळे, अल्लीशेर शेख, रमेश वानकर, भाग्यश्री धपाटे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत जाधव होते.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते तसेच मनोगतं व्यक्त केली. अशा पद्धतीने विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विविध स्पर्धा, परीक्षा, क्रीडा स्पर्धा व आंतरशालेय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

याप्रसंगी मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, होनसळ, राळेरास, हगलूरचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक जरीना सय्यद तर  सूत्रसंचालन सचिन नाईकनवरे यांनी केले. शेवटी तात्यासाहेब तांबे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.