सोलापूर : 'एक राखी सैनिक बांधवांसाठी' या अनोख्या उपक्रमांतर्गत सह्याद्री फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या राख्या सीमेवरील सैनिकांसाठी पुणे हेड क्वॉर्टरमधून वेगवेगळ्या तीन यूनिटसाठी रवाना झाल्या.
यावेळी कर्नल डी जी सी, सी ए ओ - आर आर चंडेल, हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन अभिजित खेडकर यांनी राख्या स्वीकारल्या आणि सीमेवरील विविध तुकड्या (युनिट) पर्यंत राख्या वेळेवर पोहोचवू, असं संगितले.
यावेळी सह्याद्री फाऊंडेशनच्या वतीने ए पी आय उमेश रोकडे, सह्याद्री फाऊंडेशच्या सचिव प्रतिभा खंडागळे, मंजुश्री रोकडे, प्रो. सविता वाडेकर, यशवंत खंडागळे, धनंजय भोसले, अबेद सय्यद आदी उपस्थित होते.
सह्याद्री फाऊंडेशनचे अध्यक्ष नेताजी(भाऊ) खंडागळे यांनी सर्व राख्या पाठविणारे विद्यार्थिनी, मुख्याध्यापक, शिक्षक, महिला-भगिनींचे कौतुक केले अन् आभार मानले, तसेच संरक्षण अधिकारी यांना धन्यवाद दिले.