Type Here to Get Search Results !

ब्रम्हदेव माने यांनी उभी केलेली ही संस्था आज सोलापूर जिल्ह्यातील एक आदर्श : दत्ता मुळे


कुमठे प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

सोलापूर : ब्रम्हदेव माने दादा यांनी उभी केलेली ही संस्था आज सोलापूर जिल्ह्यातील एक आदर्श शिक्षण संकुल म्हणून नावारुपाला आलेली आहे. सक्षम देशासाठी सक्षम पिढी खूप महत्वाची आहे, ती सुसंस्कारीत पिढी घडविण्याचे काम या  शिक्षण संकुलातून केलं जातं, असं प्रतिपादन बिल्डर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष दत्ता मामा मुळे यांनी केले. 


कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख अतिथी दत्ता मुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर संस्थेचे मुख्य विश्वस्त जयकुमार माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

 आज जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक कार्यात अग्रेसर संस्था म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ, कुमठे या संस्थेकडं पाहिलं जात आहे, असंही दत्ता मुळे यांनी यावेळी बोलताना सांगितले. 


याप्रसंगी संस्थेचे सचिव नागनाथ माने, विश्वस्त स्वाती माने, ब्रह्मदेव दादा माने बँकेचे  संचालक तानाजी शिनगारे, राजू मायनाळे,  प्रकाश काशीद, मल्लिनाथ कोरे, एसपीएम च्या प्राचार्या रोहिणी चव्हाण, राष्ट्रविकास प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मंगला मोरे, लिटल स्टार च्या प्रिन्सीपल शुभांगी पवार उपस्थित होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमठे प्रशालेचे प्राचार्य जयसिंग गायकवाड यांनी केले.  या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुवर्णा धारेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमठे प्रशालैचे पर्यवेक्षक वसंत गूगे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरमने झाली. या कार्यक्रमाला कुमठे व परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.