Type Here to Get Search Results !

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं जंगी स्वागत


सोलापूर : आगामी निवडणुकीच्या धर्तीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे रविवारी सायंकाळी सोलापूर दौऱ्यावर आले असता, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी त्यांचे स्वागत केले. तब्बल तीन वर्षानंतर राज ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

राज ठाकरे यांचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर शहराच्या बॉर्डरवरती भीमानगरपासून टेंभुर्णी, माढा, मोडनिंब, मोहोळ, लांबोटी, पाकणी, सोलापूर पुणे नाका व शहर आदी ठिकाणी राज ठाकरे यांचे मनसेवकांच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांच्या समवेत मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, बाबू वागस्कर, विनोद शिंदे हे नेते त्यांच्या समवेत आहेत. यावेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, जैनुद्दीन शेख, प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर, प्रशांत इंगळे, अमर कुलकर्णी, अॅड. कैलास खडके. आदीसह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

मनसेमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांनी रात्री उशिरापर्यंत राज ठाकरे यांच्या गाठीभेटी घेत आपला प्रवेश निश्चित करून घेतला. काही पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे, तर काहींना आज, सोमवारी सकाळी प्रवेशाची वेळ देण्यात आलीय. सोलापूर शहरातील स्थानिक नेत्यांच्या प्रवेशामुळे मनसेची ताकद आणखीनच वाढणार असल्याची माहिती मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली.