सोलापूर : सामान्यातल्या सामान्य माणसाला दिलासा देणारी बातमी हाती लागलीय. महाराष्ट्र शासनाच्या जनकल्याणाच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ सामान्य जनतेला झाला पाहिजे, यासाठी शासन प्रयत्नशील असतंच ... अशाच प्रयत्नातून नगर जिल्ह्यातील रूग्णाला नवजीवन मिळालंय. या रूग्णाच्या हार्ट ट्रान्सप्लांट नंतर त्याच्या कुटुंबियानी व्यक्त केलेल्या भावना शब्दात व्यक्त करण्यापलिकडंच्या होत्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्य सरकारने एक महत्वाचा वैद्यकीय उपक्रम सुरू केला. या उपक्रमात गरीब रुग्णांना राज्यातील खासगी तसेच धर्मदाय रुग्णालयात १० टक्के आरक्षित खाटा उपलब्ध होणार आहेत. यासाठी तातडीने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या ५ व्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू केल्याने विजय निवृत्ती धुमाळ या रूग्णाला नवजीवन मिळालंय.
अहमदनगर जिल्ह्यातील विजय धुमाळ याला हृदयाचा त्रास असल्याचे स्थानिक रुग्णालयात निदान झाले होते, त्याचं ह्रदय निकामी झाल्याने पुण्यातील नामवंत रूबी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया झाली, रुग्ण प्रकृतीत सुधारणा होऊ लागली, उरला होता तो प्रश्न, लाखो रुपयांच्या बिलाचा... !
गेल्या २०-२२ दिवसापासून संबधित हाॅस्पिटलकडून बिल भरण्यासाठी तगादा असताना, सामान्य कुटुंबाकडं इतकी मोठी रक्कम येणार कुठून ? हाही सवाल होताचं. त्यांनी मदतीसाठी खुलं आवाहन देखील केलं होते, मात्र मदत मिळू शकली नाही. धुमाळ कुटुंबाची समस्या रूग्णसेवक आनंद गोसकी यांच्यापर्यंत आली अन् रुग्णसेवक गोसकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदर्शी संकल्पनेतून निर्धन व दुर्बल घटकातील गरजू रूग्णांकरीता राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांना गोसकी यांनी रूग्णाची अत्यंत बिखट परीस्थिती असल्याचे सांगितले.
आरोग्यदूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाणारे रामेश्वर भाऊ नाईक यांनी संवेदनशीलतेने विजय धुमाळ या रुग्णाच्या तब्बल 23 लाख रूपये बिलाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावला. रामेश्वर भाऊंच्या कार्य तत्परतेचा आलेला अनुभव रुग्ण विजय धुमाळ यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केलाय.