Type Here to Get Search Results !

पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी केले सायबर गुन्हेगारीपासून बचावासाठी नागरिकांना मार्गदर्शन


सोलापूर : भारतीय डाक विभाग, मोहोळ यांनी आयोजित केलेल्या "डाक चौपाल" या कार्यक्रमात नागरिकांमध्ये "सायबर जनजागृती" होण्याकरिता पोलीस हवालदार इकबाल शेख (सीसीटीएनएस विभाग, सोलापूर ग्रामीण) यांना सायबर गुन्हेगारी या गंभीर विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता आमंत्रित करण्यात आले होते. 



पोलीस हवालदार इक्बाल शेख यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मोहोळ मतदार संघाचे आमदार यशवंत माने, निदेशक डाक विभाग पुणे श्रीमती सिमरन कौर, निवासी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा कुंभार यांनी कौतुक करून त्यांचा सत्कार केला. 




या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मोहोळचे आमदार यशवंत माने, निदेशक डाक सेवा, पुणे विभाग श्रीमती सिमरन कौर, निवासी जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा कुंभार, नरेंदर बाबु, अधीक्षक डाक विभाग सोलापूर तसेच डाक विभागातील वरिष्ठ अधिकारी कर्मचारी व मोहोळ तालुक्यातील सुजाण नागरिक यांच्या उपस्थित होते.