भव्य जनजागरण रॅलीमध्ये ३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
सोलापूर : अवयवदान हे मोठे सामाजिक काम असून, प्रत्येक गरजू रुग्णांना अवयव मिळायलाच पाहिजे. अवयवदात्याची गरज असलेले मोठ्या प्रमाणात रुग्ण असून प्रत्येकाने अवयवदान करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांनी केले. डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित अवयवदान महाअभियानाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला चि. पृथ्वी वरवटे, रा. उमरगा, मेंदूमृत रुग्ण यांनी अवयवदान करुन ६ लोकांना जीवदान दिले, त्यानिमित्ताने दोन मिनिटे उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विद्या तिरणकर, उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड, अश्विनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुहास कुलकर्णी, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे डॉ. श्रीकांत येळेगांवकर, डॉ. एन. बी. तेली, डॉ. संतोष हराळकर, अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लांबतुरे, सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. राजेंद्र वडजे, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. तोडकर इत्यादी उपस्थित होते.
किडनी, त्वचा, डोळे, यकृत, फुफ्फुस यासारखे अवयव आपण दान करु शकतो व आपण सर्वांनी आजच्या दिवशी अवयवदानाचा संकल्प करुन अर्ज भरावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अवयवदान समितीचे को-ऑर्डिनेटर डॉ. औदुंबर मस्के यांनी केले. या रॅलीचे स्वागत व सूत्रसंचालन अशोक लांबतुरे यांनी केले. यावेळी अवयवदान समितीचे अध्यक्ष डॉ. व्ही.एन. धडके यांनी उपस्थितांना अवयवदानाची शपथ दिली.
जागतिक अवयवदान दिनाचे औचित्य साधून पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केले होते. या स्पर्धामधील प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्यांना कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर आणि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातून या रॅलीचा शुभारंभ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आला. ही जनजागरण दिंडी (रॅली) डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून प्रारंभ पोटफाडी चौक, सिध्दार्थ हौसिंग सोसायटी, कुंभार गल्ली, जगदंबा चौक, लष्कर, सात रस्ता, संगमेश्वर कॉलेजमार्गे गरुड बंगला, रोटरी बगीचा मार्ग-भगतसिंग मार्केट मार्गे अश्विनी सहकारी रुग्णालयाच्या मैदानामध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला.
डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, एम.एम. पटेल पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र कुंभारी व अश्विनी सहकारी रुग्णालय आणि संशोधन केंद्र नियमित, सोलापूर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ (राष्ट्रीय सेवा योजना विभाग) व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने यांच्या संयुक्त विद्यमाने ही रॅली काढण्यात आली.
याप्रसंगी डॉ. हराळकर, डॉ. कसबे, डॉ. दंतकाळे, डॉ. शुभांगी धडके, डॉ. बंदीछोडे, डॉ. सोनवणे, डॉ. काबरा, डॉ. प्रशांत औरंगाबादकर, श्री. सचिन बिज्जरगी, प्रा. फरझाना पटेल, डॉ. एस.एस. पन्हाळकर, श्री. बाबुराव चंद्रकवठे, डॉ. श्रीनिवास जगताप, प्रा. विजय माने, श्री. तात्या पवार, नंदकिशोर सगरे, डॉ.ए. एस. शिंदे, प्रा. डॉ. रंजना बनसुडे, प्रा.डॉ. विकास शिंगे, हणमंतु सलगर, ज्ञानेश्वर जोशी, डॉ. एस.एस. पाटील, डॉ. धनंजय मोगले, सौ. ममता बाळासाहेब कुलकर्णी, दुमालदार, प्रा. आयेशा रंगरेज, व्ही.सी. परदेशी, सतिश राठोड आदी उपस्थित होते.
या रॅलीच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम मार्केटींग ऑफिसर स्वप्नील लांबतुरे, उमेश शिवशरण, अवधूत कुलकर्णी, मनोज परदेशी, सुर्यकांत कवलगी, नागराज दंतकाळे, नीळकंठ चौगुले, दत्तात्रय यलपले यांनी घेतले. या रॅलीच्या समारोपप्रसंगी सुगरत्न गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
... या संस्थांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग
या रॅलीमध्ये कमलाबेन पटेल नर्सिंग कॉलेज, कुंभारी, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, कुंभारी, अश्विनी नर्सिंग इन्स्टिट्युट, सोलापूर, डीबीएफ दयानंद कॉलेज, डीबीएफ दयानंद कॉलेज ऑफ एज्युकेशन, नर्सिंग कॉलेज सिव्हिल हॉस्पिटल, एसव्हीसीएस ज्युनियर व डीएड कॉलेज, देहांगदान जीवनदान संस्था समाजसेवी संस्था, संगमेश्वर महाविद्यालय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय, अश्विनी पॅरामेडिकल कॉलेज, भाई छन्नुसिंग चंदेले समाजशास्त्र महाविद्यालय, गोपाबाई दमाणी ब्लड बँक, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, शिवदारे कॉलेज ऑफ फार्मसी, युईएस महिला महाविद्यालय, कस्तुरबा कॉलेज ऑफ एज्युकेशन, वसुंधरा कला महाविद्यालय, निरामय सामाजिक संस्था, डीएव्ही वेलणकर महाविद्यालय, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज, कुंभारी, ए.आर. बुर्ला महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ सोलापूर, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एस.एस.के.एस. वन स्टॉप सेंटर संस्था इत्यादी सहभागी होते.
फोटो ओळी : रॅलीमध्ये हवेत फुगे सोडून उद्घाटन करताना कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर, प्रभारी अधिष्ठाता, डॉ. विद्या तिरणकर, उपअधिष्ठाता डॉ. नरेश झंजाड, डॉ. औदुंबर मस्के, प्रा.डॉ. श्रीकांत येळेगांवकर, डॉ.व्ही.एन. धडके, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ.एन.बी. तेली, श्री. अशोक लांबतुरे, डॉ. अभिजीत जगताप, डॉ. राजेंद्र वडजे इत्यादी छायाचित्रात दिसत आहेत.