सोलापूर : क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२४ व्या जयंतीदिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी सहाय्यक कामगार कल्याण योजना संपर्क अधिकारी नितीन साके, सिद्धू तिमिगार, अशोक खडके आदी मान्यवर उपस्थित होते.