सोलापूर : आजाराने त्रस्त पत्नीस रुग्णालयात अॅडमिट करून पतीने रुग्णालयातून काढता पाय घेतलाय. ही घटना येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, २५ जून रोजी सायंकाळी घडलीय. संजय आण्णा बुधावाले असं त्याचं नांव असून त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न मिळून आल्याने सदर बाजार पोलीस ठाण्यात या घटनेची बेपत्ता रजिस्टरला नोंद करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा, माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील संजय आण्णा बुधावाले (वय-२४वर्षे) याच्या पत्नीस क्षय रोगाचा त्रास असल्याने, तिच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने ते सोलापुरात आले होते. त्याने पत्नीस सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल केले. त्यानंतर तो बाहेर गेल्यानंतर परत आला नाही.
त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न मिळून आल्याने, २५ जून रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. रंग काळा-सावळा, बांधा सडपातळ, उंची: ५.२ फुट, बोली भाषा मराठी आणि अंगावर नेसणेस पांढऱ्या रंगाचा शर्ट व पिंक रंगाची पँट असे कपडे आहेत.
त्याचा शोध होण्या करीता किंवा त्याबाबत उपयुक्त माहिती मिळून आलेस तात्काळ इकडील पोलीस ठाणेस फोनं २७४४६४१,२७४४६४ वर लेखी/तोंडी/स्वरुपात सदर बझार पोलीस ठाण्याच्या
ps.sadarbazar.cpsol@mahapolice.gov.in
या ई मेलवर कि वा चौकशी अधिकारी पोह/१४०५ गायकवाड टि.सी यांच्या मोबाईल ९८२३०१२३४१ वर कळविण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.