Type Here to Get Search Results !

स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल व्यवस्थापन संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू



सोलापूर :  महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाद्वारे संचलित सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरींग टेक्नॉलॉजी या संस्थेत ३ वर्षाच्या बी.एस.सी. (एचएचए) पदवी तसेच पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये प्रवेशासाठी पात्र उमेदवारांकडून ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती संस्थेच्या प्राचार्यांनी कळविली आहे.

बीएससी हॉस्पिटलिटी अँड हॉटेल ॲडमिनिस्ट्रेशन हा ३ वर्षे कालावधी तसेच फूड प्रॉडक्शनमध्ये पदविका, बेकरी व कन्फेक्शनरीमध्ये पदविका, फूड अँड बेवरेज सर्व्हिसमध्ये पदविका या दीड वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदवी अभ्यासक्रमासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त १०+२ प्रणालीमध्ये कोणत्याही विद्याशाखेमध्ये ४० टक्के गुण मिळवून १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  १२ वीच्या अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी हा विषय अनिवार्य असून त्यात उत्तीर्ण असावे. अंतिम पदवी प्रदान करण्याकरिता अभ्यासक्रमाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची मान्यता राहील.

पदवी आणि पदविका अभ्यासक्रमासाठी वयोमर्यादेची अट नसून पदविका अभ्यासक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ए-१६०, कंबर तलाव जवळ, धर्मवीर संभाजी महाराज उद्यान, विजापूर रोड, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही प्राचार्यांनी केले आहे.