Type Here to Get Search Results !

हॉटेलजवळ धारदार हत्याराने भोसकून तरूणाची हत्या


मोहोळ/यासीन अत्तार : अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने अमानुषपणे भोसकून तरूणाची हत्या करण्यात आली. ही घटना मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथे रविवारी सायंकाळी घडली. विजयकुमार शिरसट असं मृताचे नांव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटेपूर्वी दत्ता वसेकर या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मसले चौधरी येथील विजयकुमार शिरसट याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत, तुम्ही लवकर या असं गावच्या पोलीस पाटील यांनी विजयकुमारच्या कुटुंबियाना निरोप दिला होता. हा निरोप मिळताच, शिरसट यांच्या घरातील सर्वजण मोहोळच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेले.

तेथे विजयकुमार शिरसट यांना पाहिले असता, त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले असल्याचे दिसले. जखमीस जवळ जाऊन पाहिले, त्यावेळी त्याच्या डोक्यात उभ्या बाजूला अज्ञात हत्याराने मारल्याने मोठी जखम झाल्याचे दिसले. त्यानंतर पोटावर बेंबीच्या वरील बाजूला पोटात भोसकलेली एक जखम दिसली.

मौजे टाकळी सिकंदर येथे पाटकुल रोडवर असलेल्या हॉटेलचा मालक दत्ता वसेकर याने रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याच्या हॉटेलजवळ धारदार हत्याराने डोक्यात वार करून पोटात भोसकून खून करून पळून गेला, असे शामराव बंडगर व इतर लोकांकडून शिरसट कुटुंबाला तेथे समजले. 

राहत्या घरातून जेवण खान करून पंढरपूर तालुक्यातील चिंचोली येथे जातो, म्हणून मोटरसायकलने घराबाहेर पडलेल्या विजयकुमारची अज्ञात कारणावरून कोणत्या तरी हत्याराने भोसकून खून करण्यात आला. या प्रकरणी पत्नी सुषमा विजयकुमार शिरसट हिने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार दत्ता वसेकर (टाकळी-सिकंदर) याच्याविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात B.N.S कलम 103(1)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक राऊत या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.