Type Here to Get Search Results !

मॅरेथॉन स्पर्धेत हर्षवर्धन हायस्कूलची कु. आरोही पाटमास प्रथमस्थानी


कासेगांव/संजय पवार : माजी आमदार दिलीपराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगे तळे (तालुका उत्तर सोलापूर) येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेममध्ये हर्षवर्धन हायस्कूलच्या खेळाडूंनी आपले वर्चस्व राखले. मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील ५ कि. मी.गटामध्ये प्रशालेतील कु. आरोही प्रदीप पाटमास हिने प्रथम क्रमांक पटकावला.

या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये १७ वर्षाखालील ५ कि. मी.गटामध्ये प्रशालेतील कु. आरोही प्रदीप पाटमास हिने प्रथमस्थानावर आली तर कु.धनश्री बाळू शिंदे ही तृतीयस्थानी राहिली. १४ वर्षाखालील ३ कि. मी. गटा मध्ये कु. रिया महेश शिंदे हिने द्वितीय क्रमांक पटकावला. सोहम सुरेश गुरव, प्रेम दशरथ डांगे ६ व्या स्थानी अक्षय प्रदीप पाटमास ७ व्या स्थानी राहिले.

या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण राऊत, तसे या खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडाशिक्षक सुरेश शिंदे व खेळाडूंचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केलं आहे.